*अवलोकन केंद्राचे*
*डिजिटल स्कुल* व _ज्ञान रचनावाद_
नमस्कार आजकालच्या डिजिटल युगात सर्व नवीन पिढी वेगाने शिक्षण घेऊ लागली आहे त्याचबरोबर शिक्षणाच्या उपलब्ध सुविधा व शिक्षणाचे महत्व सर्वांना समझल्याने शिक्षणासाठी कोणत्याही गोष्टीला सर्वजण तयार आहेत. गरज आहे फक्त आपल्या इच्छाशक्तीची.त्यामुळे आपण सर्व मराठी शाळांना एक नवीन डिजिटल युगात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत व तो पूर्णही झाला.अनेक अडचणींना सामोरे जाऊन अनेक शिक्षकांनी शाळा डिजिटल केल्या व त्याचा चेहरा मोहरा बदलल्याने मुलांमधील बदल ताबडतोब जाणवला.कारण मुलांच्या आवडत्या गोष्टी,गाणी,शैक्षणिक खेळ,डिजिटल अभ्यासक्रम,विविध सीडीज, व इतर गमतीशीर गोष्टींमधून ते मनसोक्त दप्तर मुक्त शिक्षण घेवू लागले.
आधुनिक शिक्षण मिळवण्यासाठी अनेक पालकांसाठी अनेक चांगल्या चांगल्या महागड्या शाळा उपलब्ध आहेत परंतु शासनाच्या शाळांना उपलब्ध पुरेसा निधी नसल्याने ते त्यांना अशा प्रकारचे झकपक शिक्षण देऊ शकत नव्हते. यामुळे खेड्यातील व शासकीय शाळांना आधुनिक शिक्षण मिळत नव्हते.परंतु सध्या सर्व प्राथमिक शाळेतील बहुतांशी शिक्षकांनी आधुनिक शिक्षण तसेच डिजिटल वर्ग करण्यासाठी कंबर कसली आहे.यासाठी प्रशिक्षण,मार्गदर्शन तसेच इतर सर्व गोष्टींची देवाण घेवाण सुरु झाली आहे.फार थोड्या कालावधीत विक्रमी लोकवर्गणी गोळा करून मोठ्या प्रमाणात शाळा डिजिटल झाल्या आहेत. यामुळे हजारो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले आहेत.काही शाळा आज पालकांसाठी मॉडेल बनल्या आहेत.तिथे डिजिटल संबंधी संपूर्ण मार्गदर्शन,उपक्रम तसेच इतर सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे.आपणही एकदा अवश्य भेट द्या. व आपल्या शाळेतील मुलांना खेड्यांमधून आधुनिक काळात घेऊन या व कमी कष्ठात मुलांना आवडेल अशा शिक्षण प्रवाहात घेऊन जाल हे नक्कीच...
*त्यासाठी*
आपण नक्की पहाव्या अशा शाळा :
*डिजीटल वर्गासाठी*
1.जि.प.प्रा.आदर्श शाळा, नवे भामपूर.
संपर्क व्यक्ती - श्री. तात्यासो. गुलाब शंकर पेंढारकर. ..
2.जि.प.प्रा.शाळा,खामखेडा प्र.था.
संपर्क व्यक्ती - श्री. दादासो. राजेंद्र फकीरा पाटील.
3.जि.प.प्रा.शाळा, टेकवाडे
संपर्क व्यक्ती -श्री.नानासो.संजय संभू ढीवरे.
*ज्ञान रचनावादासाठी*
4. जि.प.प्रा.शाळा,जुने भामपूर.
संपर्क व्यक्ती - श्री. नानासो.अरविंद कोळी.
*100% उपस्थिती*गुणवत्ता पुर्ण शिक्षण*
5.जि.प.प्रा.शाळा, टेंभे बु ! !
संपर्क व्यक्ती : श्री.दादासो.दिलीप देविदास देवरे.
6.जि. प. प्रा.शाळा, उखळवाळी.
संपर्क व्यक्ती : श्री. दादासो.सुनिल आनंदा सोनवणे
7.जि. प. प्रा.शाळा, धर्मराजपाडा
संपर्क व्यक्ती : श्री.दादासो. दयाराम जत्र्या कांबळे.
*उपक्रम शिल शाळेसाठी*
8.जि.प.प्रा.केंद्रशाळा, विखरण
संपर्क व्यक्ती : श्री. दादासो. बी.के.देसले.
9.जि.प.प्रा.शाळा, जळोद
संपर्क व्यक्ती : श्री.नानासो.पांडूरंग निळकंठ पाटील.
*100%उपस्थिती व गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी*
अजूनही अशा आदर्श डिजिटल शाळा आहेत कि त्या या प्रवाहात आल्या आहेत. आपणही वरील शाळेला भेट देऊन मार्गदर्शन घेऊ शकता.
*आमचे प्रेरक व मार्गदर्शक*
●श्री.बापूसाहेब पी. झेड. रणदिवे. ( शिक्षण विस्तार अधिकारी विखरण बीट तथा गट शिक्षणाधिकारी पं.स.शिरपूर )
●श्री.बापूसो.के.व्ही.भदाणे. (केंद्र प्रमुख विखरण.)
~शब्दांकन~ *श्री. सुरेश सोनवणे*
जि. प. केंद्रशाळा विखरण.
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
No comments:
Post a Comment