news

Monday, January 23, 2017

शाळा एक उपक्रम अनेक

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ध्येयपुर्तींतर्गत*

👇〰〰〰➖〰〰〰👇

*केंद्रस्तरीय शिक्षण परिषद* *केंद्र -विखरण.

विखरण केंद्रात उज्वल भविष्याचा परिघ धारण केलेल्या शैक्षणिक वलयाचा एकमेव केंद्रबिंदू म्हणजे *प्रगत विद्यार्थी*... आणि याच केंद्रबिंदू च्या प्रगतीसाठी  धडाडीने यशोदिद प्रयत्नरत असणार्‍या  *शिक्षणप्रेमी व सामाजिक बांधिलकी जोपासणारे मा.श्री.रघुभाई भरवाड , शा.व्य.समिती अध्यक्ष ; मा.बी.के.देसले.पदोन्नती मुख्याध्यापक; केंद्र प्रमुख साहेब मा.के.व्ही.भदाणे * यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली  *केंद्रस्तरीय शिक्षण परिषद* आणि *शिक्षण परिषदेचे औचित्यसाधून डिजिटल स्कूल परीचय सोहळा जि.प.केंद्रशाळा विखरण येथे*यशस्विपणे पार पडला ..

*स्थळ*                     

🏚 *जिल्हा परिषद केंद्रशाळा विखरण   ता.शिरपूर.जि.धुळे                                         *दिनांक*

🗓 *दि. 21/1/2017                          वार-शनिवार*                               

   ⏱ *वेळ-  सकाळी 11.00 ते सायं. 3.00*

     🌑 *सूत्रसंचालन*🌑

     🙏*श्री .अरविंद सोनवणे*🙏


🌺विद्यादेवता सरस्वती व क्रांतिज्योती सवित्रीबाई फूले यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन 🌺

🌹🌹*सांस्कृतिक कलामंच*    *यात आमच्या शाळेतील इयत्ता तिसरी च्या विद्यार्थीनी विविध असे सदाबहार ईशस्तवन सादरीकरण केले.

🔔 *स्वागत गीत-* शाळेच्या विद्यार्थिनीनी सादर केले. 

           *मार्गदर्शन*

मा.के.व्ही.भदाणे. केंद्र प्रमुख यांनी

शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकांशी मनमोकळा संवाद केला. तसेच रचनावादावर आधारीत प्रभावी अध्यन अध्यापनाचे फायदे विशद केले.बाल मेळावा घेणे,सांस्कृतिक कार्यक्रम घेणे याविषयी मार्गदर्शन केले .तसेच केद्रांतील सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.व केंद्रातील कामात प्रगती होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन  शिक्षकांचे अभिनंदन केले.तसेच केंद्रातील प्रत्येक शाळा डिजिटल,रचनावादी झाल्याबद्दल सर्व शिक्षकांचे कौतुक केले. तसेच शाळा भेटी दरम्यान ज्या चांगल्या बाबी दिसल्या त्या विषयी शिक्षकाचे कौतुक केले व प्रेरणा दिली.गणित प्रशिक्षणासाठी नोंदणी चा शाळा निहाय आढावा घेतला.सरल प्रणालीचा शाळा निहाय आढावा घेतला.

शिक्षकांनी प्रेरणा घेऊन शाळा विद्यार्थी प्रगत करण्यासाठी सुचना केली.

🔣       *गणित पेटी कार्यशाला*

*श्री.देवरे सर*(विषय तज्ञ),गट साधन केंद्र, शिरपूर

सरांनी गणित पेटीमधील साहित्य कसे वापरावे .गणितातील संबोध या साहित्याद्वारे विद्यार्थ्यांना कसे स्पष्ट करावे,याचे विस्तृत मार्गदर्शन केले .

          --------------------------------------

कार्यक्रमात सर्व शिक्षकांनी  सहकार्य केले तसेच केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी उपस्थीत राहून परिषदेची शोभा वाढविली.     

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

      *आयोजक* =*हेमंत नांद्रे*

~~~~~~~~~~~~~~~~ 

*अल्पोपहार**चहापान* = श्रीमती =कल्पना निकम मॅडम., मीनाक्षी पवार मॅडम ; बडगुजर मॅडम ; ठाकरे मॅडम.

                                                                                                                      ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

            *आभार* व *वृत्तलेखन*   

  *✍ सुरेश सोनवणे*

*प्राथमिक शिक्षक विखरण*

➖〰〰〰➖〰〰〰➖  

प्रचार व प्रसिद्धी

👉 श्री मनाेहर पांडुरंग वाघ सर

🎯 साधनव्यक्ती, गट साधन केंद्र शिरपूर जिल्हा धुळे

📱 9763236070


No comments:

Post a Comment

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template