news

Saturday, July 22, 2017

तंत्रज्ञान हे विद्यार्थ्यांला नव्या विश्वाची ओळख करून देते

*चला होऊ या तंत्रस्नेही, करूया विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास -मनोहर वाघ*

आर सी पटेल संकुलात तंत्रस्नेही  माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन 22 जुलै 2017 रोजी  एस एम पटेल हॉल करवंद नाका शिरपूर  येथे करण्यात आले .

       

       सदर   कार्यक्रमाला अध्यक्ष रावसाहेब प्रभाकर चव्हाण , प्रमुख अतिथी डॉ .उमेश जी शर्मा ( सी .ई .ओ . आर सी पटेल संकुल ) उपस्थित होते .

                     प्रशिक्षणाला मार्गदर्शकाचे कार्य  मनोहर वाघ (विषय साधनव्यक्ती डायट,धुळे),अशोक ढीवरे , गणेश सोनवणे ,दिनेश धनगर  पंचायत समिती शिरपूर हे करीत आहेत  .

        सदर प्रशिक्षण दिनांक 22/07/2017 ते  23/07/2017 या काळात घेण्यात येत आहे .

        प्रशिक्षणास  इंटरनेट ,जी -मैल ,यु -टुब, QR कोड तयार करणे ,पी पी टी ,गूगल ड्राइव  इ. बाबी वर प्रशिक्षण  देण्यात येत आहे .

        संस्थेचे सचिव रावसाहेब प्रभाकर चव्हाण यांनी आपल्या मनोगतात  संकुलातील शैक्षणिक आलेख वाढावा या साठी शिक्षक वर्गांने  मेहनत घ्यावी असे आव्हान केले . तसेच संस्थेचे सी .ई.ओ. डॉ .उमेश शर्मा यांनी शिक्षक वर्गांने  काळा सोबत बदलले  पाहिजे आणी या उदेश्याने संस्थेचे कार्य सुरू असते असे स्पष्ट  केले .आणी यासाठी अमरीशभाई  पटेल, भूपेशभाई पटेल ,राजगोपाल भंडारी यांचे मार्गदर्शन लाभत असते .

   सदर प्रशिक्षणास माध्यमिक शाळेचे प्राचार्य  , शिक्षक बंधु व भगीनी उपस्थित आहेत .


No comments:

Post a Comment

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template