news

Thursday, December 14, 2017

"शिरपूर येथे वाचन क्षमता विकसन कार्यशाळा संपन्न"

"वाचन क्षमता विकसन कार्यशाळा"

--------------------------------------------------------

शिरपुर येथिल पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल येथे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली "वाचन क्षमता विकसन कार्यशाळा संपन्न झाली "आज कार्यशाळा समारोपाच्या दिवशी प्राचार्य मा.डॉ. विद्या पाटील यांनी भेट दिली व शिक्षकांशी संवाद साधताना म्हणाल्यात की प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवत असताना धुळे जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक  दृष्टीने सक्षम करण्यासाठी एकजुटीने कार्य करूया व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवून या

या प्रसंगी श्री.पी.झेड.रणदिवे गटशिक्षणाधिकारी शिरपूर यांनी कार्यशाळा आयोजनाचा उद्देश उपस्थितांना समजावून सांगितला.विषय सहायक श्रीमती. सुधर्मा सोनवणे सुध्दा उपस्थित होत्या.

या कार्यशाळेत ५१ शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत, साधनव्यक्ती म्हणून श्री. गोपाल कुमावत,श्री. मल्हारी सूर्यवंशी,श्रीमती. माधवी देसले, श्रीमती. तृप्ती शिंदे, श्रीमती.शिवांगी देवरे,रामदास सर,यांनी कार्यशाळेस मार्गदर्शन केले,मुलांना वाचन क्षमता ९० दिवसात याव्यात यासाठी विद्या प्राधिकरण, पुणे यांनी शैक्षणिक साहित्यची एक किट सुद्धा पुरवली आहे या द्वारे जलद व प्रभावी वाचन क्षमता विकसित करण्यास मदत होईल, या कार्यशाळेचे सुत्रसंचालन श्री. मनोहर वाघ सर यांनी केले व आभार श्री.सचिन जडिये सर यांनी मानलेत.

*प्रचार व प्रसिद्धी*

श्री. मनोहर वाघ सर,तंत्रस्नेही साधनव्यक्ती,

गट साधन केंद्र, शिरपूर जिल्हा धुळे

************* कार्यशाळेचे क्षणचित्रे ****************


1 comment:

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template