news

Wednesday, November 28, 2018

नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवणार शिरपूर तालुका



 *मा.डॉ.विद्या पाटील मॅडम (प्राचार्य, DIECPD, धुळे) यांची शिरपूर तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता सुसंवाद व सुलभकाच्या भूमिकेतून बहुउद्देशीय मार्गदर्शनपर भेटी* 


 *दि.28/11/2018 बुधवार*


 आज दि.28/11/2018 बुधवार रोजी *मा.प्राचार्य डॉ. विद्या पाटील मॅडम* यांनी सुरुवातीस शिरपूर तालुक्यातील न.प.उर्दू शाळा क्र.5 येथे असलेल्या *नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रास* भेट दिली. प्रत्यक्ष शाळेतील लॅब व उपकरणं यांची पाहणी करून मुख्याध्यापक श्री.बिलाल सर आणि प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांसोबत खालील विषयावर चर्चा केली :-

溺विज्ञान केंद्राची सद्यस्थिती व लाभ घेतलेल्या शाळा व विद्यार्थ्यांची माहिती


溺नोंदी ठेवलेले रजिस्टर व इतर रेकॉर्ड बाबत जाणून घेतले


溺सर्व विद्यार्थ्यांना उपकरणं हाताळण्याचे कौशल्य विकसित करणे, सर्व प्रयोगांचे QR कोड scan करून you tube वरील प्रयोगाचे व्हिडिओ बघणे, प्रयोग पुस्तकाचा संदर्भ म्हणून वापर करणे याबाबत मार्गदर्शन केले.


溺शहरातील सर्व शाळा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान केंद्राचा लाभ देण्याबाबत नियोजन करण्याचे सूचित केले.

⚗溺裂匿離


यानंतर मा.प्राचार्य डॉ.विद्या पाटील मॅडम यांनी शं.पा.माळी माध्य.विद्यालय येथे *गटशिक्षणाधिकारी मा.पी.झेड.रणदिवे साहेब* आणि सर्व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या *माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी आयोजित सहविचार सभेस खालील विषयांवर चर्चा व मार्गदर्शन केले :-*

हंगामी स्थलांतरित विदयार्थी व उपाययोजना

नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राचा लाभ विद्यार्थ्यांना देणेसाठी भेटींचे नियोजन

DIECPD धुळे येथे नव्याने सुरू झालेल्या *व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन* या कक्षाबाबत सविस्तर माहिती

विविध शैक्षणिक उपक्रम

✅ *मा.प्राचार्य मॅडम यांनी  गटशिक्षणाधिकारी मा.पी.झेड.रणदिवे साहेब यांच्या उत्कृष्ठ नियोजन व सक्षम प्रशासन कौशल्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.* 


*मा.रणदिवे साहेब यांनी सहविचार सभेत खालील विषयांवर चर्चा व मार्गदर्शन केले :-*

नवोदय विद्यालय परीक्षा 2019

बेटी बचाव बेटी पढाव मोहीम

मानव विकास मिशन सायकल खरेदी आढावा

बालभवन भेटी आढावा व नियोजन

तंबाखूमुक्त अभियान केलेली कार्यवाही

विज्ञान प्रदर्शन 2018 नियोजन

स्थलांतर व शाळाबाह्य विद्यार्थी

शा पो आहार दूध भुकटी आढावा

गोवर रुबेला लसीकरण मोहीम 2018 आढावा


⏰सहविचार सभा आटोपून *मा. प्राचार्य डॉ.विद्या पाटील मॅडम यांनी नव्याने सुरू झालेल्या जि.प.शाळा उगबुड्यापाडा येथे भेट दिली.* भेटीदरम्यान सोबत केंद्रप्रमुख मा.मल्हारी सूर्यवंशी सर, विषय सहाय्यक श्री.हेमकांत अहिरराव तसेच विषयसाधनव्यक्ती श्री.सचिन जडिये उपस्थित होते.

*शाळाभेटीदरम्यान अनुभव :-*

शाळेमध्ये मा.प्राचार्य मॅडम यांनी शाळेवरील शिक्षक श्री.नीतीन वाघ सर आणि सर्व विद्यार्थी यांचे सोबत परिचय करून चर्चा केली.

विद्यार्थ्यांना गटामध्ये बसवून शैक्षणिक साहित्याद्वारे अंकओळख, अक्षरओळख यांचा सराव घेतला.

विद्यार्थ्यांना आपुलकीने त्यांच्या आवडनिवड, छंद याबाबत विचारपूस करून वातावरण निर्मिती केली.

काही दिव्यांग विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले.

कर्णबधिर विद्यार्थ्यांसोबत विशिष्ट हावभाव व हातवारे करून संभाषण साधले.

विद्यार्थ्यांनी केलेले गायन व सादर केलेल्या विशिष्ट बाबींचे कौतुक करून प्रोत्साहन दिले.

शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला यांचे सोबत हितगुज केले.

गावातील ग्रामस्थ व पालक यांची भेट घेऊन गावाच्या भौगोलिक परिस्थिबाबत माहिती जाणून घेतली आणि सर्वांना शिक्षणाचे महत्त्व समजावून देत शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले.

शाळेवरील शिक्षक श्री.नितीन वाघ सर यांच्या प्रामाणिक पणाचे व कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

मा.रणदिवे साहेब व केंद्रप्रमुख श्री.सूर्यवंशी सर यांचे सोबत नवीन शाळेच्या विकासासाठी विविध उपक्रम व उपाययोजना याविषयी चर्चा केली.


 *यानंतर मा.प्राचार्य डॉ.विद्या पाटील मॅडम यांनी सानेगुरुजी माध्यमिक विद्यालय, विखरण येथील विशेष उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण डिजिटल सायन्स लॅब ला भेट दिली.* तेथील उपक्रमशील विज्ञान शिक्षक *श्री.नरेंद्र कापडे सर* यांनी प्रत्यक्षिकाद्वारे सादर केलेल्या लॅबविषयीच्या सविस्तर मॉडेल विषयी समजावून घेत चर्चा केली व त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.


✅ *या संपूर्ण शैक्षणिक भेटीदरम्यान मा.प्राचार्य डॉ.विद्या पाटील मॅडम यांच्या सोबत आलेले अनुभव आणि आणि त्यांची कार्यशैली मला (सचिन जडिये) विषयसाधनव्यक्ती या भूमिकेसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरली.*


✍ *प्रत्यक्ष अनुभव व संकलन*✍

*सचिन जडिये*

*विषयसाधनव्यक्ती,*

*BRC, शिरपूर*


No comments:

Post a Comment

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template