news

Wednesday, July 24, 2019

मोहिदा येथे डिजीटल रूमचा लोकार्पण सोहळा संपन्न

*मोहिदा येथे डिजीटल रूमचा लोकार्पण सोहळा*


आज दि. 24.07.2019 रोजी जि.प.शाळा मोहिदा येथे मा.प्रकाशजी रणदिवे (ग.शि.आ.शिरपूर),मा.डाॅ निताजी सोनवणे (शि.वि.अ.सांगवी), मा.किशोरजी भदाणे (के.प्र.पळासनेर) व मा. बाबुलाल पावरा (अध्यक्ष शा.व्य.स.मोहिदा) यांच्या हस्ते डिजिटल रूमचे लोकार्पण करण्यात आले.

याच महिन्यात 15 दिवसांपूर्वी मा. रणदिवे साहेबांनी शाळेला भेट दिली होती. त्यावेळी साहेबांनी तिन्ही शिक्षकांना लवकरात लवकर डिजिटल रुम तयार करण्याचे आवाहन केले व 2000 रु. वर्गणी दिली होती. तिन्ही शिक्षकांनी स्वखर्चाने 15 च दिवसात डिजिटल रुम तयार केली व मला उद्घघाटनासाठी बोलवले याबद्दल साहेबांनी आनंद व्यक्त केला. मा.सौ.सोनवणे मॅडम व मा. श्री भदाणे सर यांनीही समाधान व्यक्त केले.

सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मग डिजिटल रूमचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते गुलमोहराचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आनंद घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.उमाकांत गुरव यांनी केले. प्रास्ताविक श्री ईश्वर पावरा व आभार प्रदर्शन श्री मुकेश कोष्टी यांनी केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते श्री सी. एस पाटील (मुख्याध्यापक शेमल्या) श्री रा.का.पाटील (मुख्याध्यापक पळासनेर), श्री स्वप्निल पावरा (पोलीस पाटील मोहिदा), श्री मनोहर वाघ(विशेष साधन व्यक्ती), श्री प्रमोद भोई (समावेशीत साधन व्यक्ती ), श्री समाधान बोरकर (विशेष शिक्षक), श्री विजयानंद शिरसाठ, श्री के. बी. पवार, श्री मधुकर थेले व गावातील शिक्षणप्रेमी नागरीक बैसाणे आप्पा,निता पावरा, सीमा पावरा, रंजना पावरा, योगिता पावरा, अशोक पावरा, हिरालाल पावरा,नारसिंग पावरा, सुनिल बैसाणे, मुकेश पावरा, इखला पावरा आदि ग्रामस्थ   मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शा.व्य.स.अध्यक्ष बाबुलाल पावरा, मुख्याध्यापक ईश्वर पावरा, सह शिक्षक मुकेश कोष्टी व उमाकांत गुरव यांनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template